तामिळनाडू-आंध्र प्रदेशात १ हजार ३३२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी   

नवी दिल्ली : तामिळनाडू-आंध्र प्रदेशात १ हजार ३३२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने बुधवारी मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.अश्विनी वैष्णव म्हणाले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील तिरुपती ते काटपाडी पर्यंतच्या १०४ किमीच्या सिंगल रेल्वे लाईनचे दुहेरी लाईनमध्ये रूपांतर केले जाईल. यासाठी १ हजार ३३२ कोटी रुपये खर्च येईल. यामुळे आंध्र प्रदेशातील तिरुमला वेंकटेश्वर मंदिराशी कनेक्टिव्हिटी वाढेलच; परंतु श्री कालहस्ती शिव मंदिर, कनिपकम विनायक मंदिर, चंद्रगिरी किल्ला इत्यादी प्रमुख ठिकाणांना रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील मिळेल. या प्रकल्पामुळे जवळपास ४०० गावे आणि १४ लाख लोकसंख्येला जोडणी मिळेल. 
 
याशिवाय, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सिंचन सुविधांच्या उन्नतीसाठी एक उप-योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी १६०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.या योजनेद्वारे, क्लस्टरमधील विद्यमान कालव्यांतून किंवा पाण्याच्या इतर स्रोतांतून सिंचनासाठी पाणीपुरवठा करता येईल. यामध्ये, पाण्याच्या स्त्रोतापासून ते एक हेक्टरपर्यंतच्या शेतांपर्यंत भूमिगत पाईपलाईनसह सूक्ष्म सिंचनासाठी एक मजबूत पायाभूत सुविधा निर्माण केली जाईल.

पंजाब-हरयानासाठी १८७८ कोटींचा रस्ता प्रकल्प

मंत्रिमंडळाने ६ पदरी झिरकपूर बायपासलाही मान्यता दिली आहे. ही गाडी झिरकपूर येथील राष्ट्रीय महामार्ग-७ (चंदीगड-बठिंडा) च्या जंक्शनपासून सुरू होईल आणि हरयानातील पंचकुला येथे राष्ट्रीय महामार्ग-५ (झिरकपूर-परवाणू) च्या जंक्शनवर संपेल.
 

Related Articles